लासूर्णे येथे संत शिरोमणी सावता माळी यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी.

Spread the love

प्रतिनिधी – संतोष कदम.


लासुर्णे : ( ता. इंदापूर ) संत शिरोमणी सावता माळी यांची पुण्यतिथी लासुर्णे येथील संत सावता माळी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. दत्तात्रय महाराज गलांडे यांचे फुलांचे कीर्तन दहा ते बारा या वेळेत पार पडले. महाराज यांच्या फुलांच्या कीर्तन सेवेमुळे संपूर्ण लासुर्णे नगरीच जणू भक्ती सागरात चिंब झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.


यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले तरुण मंडळ लासुर्णे यांच्या वतीने करण्यात आले होते. मंडळातील 50 पेक्षा अधिक तरुण वर्ग उस्फूर्तपणे सहभागी झालेला होता. मंडळाकडून या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी भावीक, भक्त, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार