Chalisgaon Crime News : दुचाकीला ओव्हर टेक केल्याने दुचाकीवरील तिघांनी बसचालकाची कॉलर पकडून त्याला बसच्या कॅबिनमधून ओढून अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर ( video Virel ) व्हायरल झाला आहे.
Highlights :
- दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग
- अश्लील शिवीगाळ करत बसचालकाला मरहाण
- चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील घटना
चाळीसगाव : – सध्या महाराष्ट्रात दादागिरी करून मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दुचाकीला ओव्हर टेक केल्याने दुचाकीवरील तिघांनी बसचालकाची कॉलर पकडून त्याला बसच्या कॅबिनमधून ओढून अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद गावाजवळ १६ जुलै रोजी घडलेल्या बस चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून एस.टी,कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
चाळीसगाव डेपोच्या बस असून आबा लक्ष्मण नालकर रा. सिंधी ता.चाळीसगाव असे बसचालक असून ते घटनेत जखमी झाले आहेत. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव बस आगारात आबा लक्ष्मण नालकर रा. सिंधी ता.चाळीसगाव हे बसचालक म्हणून नोकरीला आहे. १६ जुलै चाळीसगाव-कुंझर बस क्रमांक (एमएच २० डी ९८०६) दुपारी ४ वाजता चाळीसगावहून कुंझरला जाण्यासाठी निघाली. शहरापासून पुढे धुळे रोडवरील विराम गार्डनजवळ बसच्या पुढे दोन दुचाकी डबल सीट जात होत्या. त्यावेळी चालक आबा नालकर यांनी दोन्ही दुचाकींना ओव्हरटेक करत बस पुढे नेली. याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी भोसर फाट्याजवळ बस आडवून थांबवली. त्यातील एकाने “तू आमच्या मोटरसायकलला ओव्हरटेक का केले असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. “तू दहिवद गावाजवळ ये तुला पाहून घेतो’ अशी धमकी देऊन पुन्हा दुचाकीवर बसून पुढे निघून गेले.
बस चालकाने दहीवद येथील प्रवाशांना गावाजवळ उतरविले. या गावाजवळ पुन्हा या तिघांनी बस थांबवून चालक आबा नालकर यांना कॉलर पकडून बस कॅबिनच्या बाहेर ओढत बेदम मारहाण केली. यात नालकर हे गंभीर जखमी झाले. बसमधील वाहक सचिन मदनदास बैरागी व प्रवाशांनी मध्ये पडून हे भांडण सोडवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेबाबत चालक आबा नालकर यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नवल भीमराव पवार, भाईदास सुभाष बोरसे, यशवंत उर्फ सनी भीमराव पवार तिन्ही रा. दहिवद ता.चाळीसगाव यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहुणबारे पोलीस कर्मचारी करीत आहे. दरम्यान या घटनेमुळे एस.टी कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांना अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हे वाचलंत का ?
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.