अरे बापरे ! नारळाएवढा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश, शेतकऱ्याचे प्राण वाचले , धुळ्यात यशस्वी शस्त्रक्रिया

Spread the love

धुळे : – धुळ्यात डॉक्टरांना भारतातील सर्वात मोठ्या मुतखड्यावरचे ऑपरेशन ( kidney stone operation) करण्यात यश आले आहे, 980 ग्रॅम वजनाचा व 12 सेंटीमीटरपेक्षा मोठा असलेल्या मुतखड्याचा ऑपरेशन करून त्याला बाहेर काढण्यात डॉ. आशिष पाटील यांना व त्यांच्या टीमला यश आले आहे. इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या सर्वात मोठ्या मुतखड्याची नोंद देखील करण्यात आली आहे.

आतापर्यंत मुतखड्याचा सर्वात मोठा आकार किती असल्याचं बघितलं आहे. पाच- दहा ग्रॅम किंवा जास्तीत जास्त 100 ग्रॅम, परंतु, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल धुळ्यात (dhule) एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 980 ग्रॅम वजनाचा व जवळपास 12 सेंटीमीटर पेक्षाही मोठ्या आकाराचा मुतखडा यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे.

अनेक ठिकाणी केले उपचार

रमण चौरे या नंदुरबार येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून लघवीचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता, यावर त्यांनी बहुतांश ठिकाणी उपचार देखील घेतले. परंतु कुठल्याही प्रकारे आराम वाटत नसल्याने अखेर रमण चौरे यांनी धुळ्यातील डॉक्टर आशिष पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यानंतर डॉक्टर आशिष पाटील यांनी मुतखड्याशी संबंधित सर्व चाचण्या करून घेतल्या, त्यात त्यांना रमण चौरे यांच्या पोटात मोठ्या आकाराचा मुतखडा असल्याचे लक्षात आले, डॉक्टर आशिष पाटील व त्यांच्या टीमला हा मुतखडा बाहेर काढण्यात यश आले आहे.

गोळा पाहून बसला धक्का

शस्त्रक्रिया झाल्यानंतर या मुतखड्याचे वजन व आकार पाहून स्वतः डॉक्टर देखील थक्क झाले, आता या मुतखड्याची दखल इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे, आणि भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे, त्यामुळे पोटाच दुखण दुर्लक्षित करणे आपल्या जीवावर देखील बेतू शकतं हेच या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डॉक्टर आशिष पाटील यांनी पोटदुखीने त्रस्त असल्या रुग्णांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार