नवी दिल्ली : – सध्या देशात सैक्स रॅकेट घ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांना उत्तर प्रदेशातील हापूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर आता पोलीस तपासात पुढे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बर्नार्ड एन मारक यांच्या फार्महाऊसमधून आधी कंडोम सापडली होती. त्यानंतर आता तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मारक यांना अटक करून पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील तुरा इथे आणण्यात आले. पोलिसांनी मारकविरुद्ध स्फोटक पदार्थ कायदा आणि पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.
मारक हा माजी अतिरेकी नेता आहे. २२ जुलै रोजी पोलिसांनी मारक यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला. तेव्हापासून मारक फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी ७३ जणांना अटक केली तर ६ अल्पवयीन मुलांची (चार मुले आणि २ मुली) सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्नार्ड एन मारक यांच्या फार्महाऊसमधून ३५ जिलेटिन काठ्या, १०० डिटोनेटर्स आणि चार क्रॉस बो, १५ बाण जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा बाल संरक्षण विभाग आणि पोलिसांचे पथक सुटका करण्यात आलेल्या मुलांची पुस्तकं आणि कपडे घेण्यासाठी गेले असता पोलिसांनी ही स्फोटके आणि शस्त्रे जप्त केली. पोलिसांनी मारेकऱ्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या ६ अल्पवयीन मुलांपैकी एकाचे शारीरिक शोषण झाल्याचे उघड झाले आहे.
हे पण वाचा :
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






