फर्दापुरात संशयितरित्या फिरत असलेल्या परराज्यातील दोघांना अटक,सोयगाव तालुक्यातील घटना

Spread the love

सोयगाव.दि.३०(प्रतिनिधी)गस्त घालत असतांना फर्दापूर पोलिसांना संशायास्पद पर राज्यातील दोन जन काही तरी गंभीर गुन्हा घडवून आणन्या च्या उद्देशाने फिरत असतांना अढळून आल्याने दुचाकी सह दोघांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की फर्दापूर पोलीस ठाण्या चे कर्मचारी निलेश लोखंडे.पंकज व्यावहारे.योगेश कोळी हे फर्दापूर गावात गस्त घालत असतांना माहिती मिळाली कि अजिंठा लाँज मागे दोन ईसम हे संशयास्पद हलचाली करत फिरत आहे.या वरुन निलेश लोखंडे. पंकज व्यवहारे.योगेश कोळी.हे गेले असता गुरूलाल हरसींग गुलाला(वय२४)आद्दा दशरथ गुलाल(वय३५)दोघे रा.नाहलबंद पोस्ट धावली जि.बडवानी.(मध्यप्रदेश)
हे दोघे फिरत होते त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता

त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत होते यावरून पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही संशयीतांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे फर्दापूर येथे आणून कसुन चौकशी केली असता आरोपींनी सिल्लोड तालुक्यातील मोढा येथून एक मोटारसायकल चोरून ते फर्दापूर येथे दुसरा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली या वरुन फर्दापूर पोलिसांनी गुरलाल हरसिंग भिलाला व आद्या दशरथ भिलाला या दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्या कडील चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

ही कारवाई सा.पो.नि देवीदास वाघमोडे पो.ना निलेश लोखंडे पो.अ पंकज व्यव्हारे योगेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार