भिषण अपघात : क्लास संपल्यावर घरी जात असताना ट्रकने अल्पवयीन मुलीस चिरडले.

Spread the love

चाळीसगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच चाळीसगाव शहरत एक धक्कादायक अपघात झाला आहे क्लास संपल्यावर स्कुटीने घरी जात असताना अल्पवयीन मुलीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात मुलगी ठार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार रोजी सायंकाळी धुळे रोडवरील महामार्गावर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, कु. सायली भागवत हडपे (वय-१५) रा. शिवदर्शन कॉलणी, चाळीसगाव हि मुलगी शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास क्लास संपल्यावर आपल्या स्कुटीने (क्र. जीजे ०६ बी क्यू ०४५४) घरी जात जात होती. तेव्हा अचानक मागून भरधाव वेगाने धुळेकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एम.एच.४६ एफ ३२३२) जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात कु. सायली भागवत हडपे या मुलीचे उजवा हात व उजवा पाय ट्रकच्या पुढील चाकाखाली दाबले गेले.

यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचाराकामी दाखल केले असता पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार तिला नाशिकला घेऊन जात असताना रस्त्यात तिचे प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचणामा केला.

दरम्यान अपघातग्रस्त वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार