सोयगाव, दि.३१
सिल्लोडच्या जाहीर सभेतून थेट फर्दापुरातील शिवस्मारक व भीमपार्कच्या जागांचे भूमिपूजन रविवारी दि.३१ एका क्लिक वरून ऑनलाइन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी सिल्लोड ला भव्य नागरी सत्कार व सिल्लोड शहरातील विबिध विकासकामांचे उदघाटन कार्यकम आयोजित करण्यात आला होता
यावेळी सिल्लोडच्या थेट जाहीर सभेतून एका क्लिकवर बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फर्दापुरातील भव्य शिवस्मारक व भीमपार्क च्या जागांचे भूमिपूजन करण्यात आले लाखोंच्या साक्षीने झालेल्या या उदघाटन सोहळा पाहण्यासाठी सिल्लोड,सोयगाव आणि भोकरदन तालुक्यातील नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे,आमदार अब्दूल सत्तार,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री उदय सामंत,सुरेश जाधव,सुरेश नवले, सयाजीराव गायकवाड,संजय राठोड,आदींसह जिल्ह्यातील नगराध्यक्ष,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदींची उपस्थिती होती
पहिल्या टप्प्यात शिवस्मारकाच्या कामासाठी ३० कोटी रु चा निधी वितरित करण्यात आला तर भीमपार्क साठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रु चा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शिवस्मारक साठी फर्दापुर शिवारातील गट क्र-67 मधील दहा एकर व मौजे ठाणा शिवारातील गट क्र-२९ मधील दहा एकर जागा भीमपार्क साठी शनिवारी ग्रामविकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना हस्तांतरित करण्यात आल्याची कार्यवाही तहसीलदार रमेश जसवन्त यांनी केली होती
चौकट—फर्दापुरातील शिवस्मारक व भीमपार्क या जागांचा ऑनलाइन भूमिपूजन प्रसंगी तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,ग्रामसेवक सुनील मंगरुळे, आदी भूमिपूजन प्रसंगी फर्दापुरातील घटनास्थळी हजर होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






