धरणगाव येथे युवासेनेची भव्य स्वाक्षरी मोहीम.

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी:– धरणगाव येथे युवासेने तर्फे आज भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.त्यात प्रामुख्याने तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले.डिजिटल ब्यानरवर मार्करच्या साहाय्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते स्वाक्षरी करून मोहिमेस सुरुवात करण्यात आली

तदनंतर सर्व शिवसेना पदाधिकारी , युवासेना पदाधिकारी,नगरसेवक,शिवसैनिक यांनी स्वाक्षरी करून मोहिमेस जोरदार प्रतिसाद देत महाराष्ट्रा विषयी केलेल्या वक्त्याव्याचा ही या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ मा. नगराध्यक्ष निलेश चौधरी नगरसेवक वासूदेव चौधरी,धिरेंद्र पुरभे, अहमद पठाण,भागवत आप्पा चौधरी, सुरेश महाजन जितेंद्र धनगर शरद माळी सर राजेंद्र चौधरी परमेश्वर महाजन बापू महाजन भरत महाजन गजानन महाजन भगवान महाजन कमलेश बोरसे राहुल रोकडे योगेश पाटील सुदर्शन भागवत विनोद रोकडे अविनाश चौधरी,विलास पवार यांचेसह सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार