Virel Video : फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, पहा एकनाथ शिंदेंचा व्हायरल किस्सा.

Spread the love


Cm Eknath Shinde Video : काय सांगता..? मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवून फोन लावला की काय ?

आता मुख्यमंत्र्यांचा मालेगावच्या सभेतला एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला की खरंच मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवले होते काय? तो व्हिडिओही पाहा…

मालेगाव : – गेल्या एक महिन्यापासून राज्यात एकच नेता चर्चेत आहे, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पत्त्याच्या डावासारखा कोसळायला भाग पाडलं. त्यानंतर 50 आमदारासह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर सर्वांनाच सरप्राईज करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती ही एकनाथ शिंदे हेच विराजमान झाले. मुख्यमंत्रीपदाचे सूत्रं हाती हेतल्यानंतही  त्यांनी राज्यात निर्णयांचा धडाका लावला. अधिकाऱ्यांना फोनवरती, फोन जाऊ लागले. मुख्यमंत्र्यांचे त्याचे अनेक व्हिडिओही चर्चेत आले. कुणाला रुग्णालयात फोन लावल्याचे  व्हिडिओ (Cm Eknath Shinde Video Call) बाहेर आले, तर कुठे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करताना मुख्यमंत्री दिसून आले. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा मालेगावच्या सभेतला एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला की खरंच मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवले होते काय? तो व्हिडिओही पाहा…

मुख्यमंत्र्यांचा व्हायरल व्हिडिओ पहा..


मुख्यमंत्र्यांचा तो किस्सा चर्चेत पुर्ण व्हिडिओ

व्हिडिओ मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात?

आपली ही कार्यपद्धती समजावून सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मालेगावमधील या सभेत एक किस्सा सांगितला. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या ओळखीतील व्यक्तीवर उपचार सुरु होते. त्यावेळी संबंधित व्यक्तीचे तपासणीचे रिपोर्ट मिळण्यास काही कारणाने उशीर होत असावा. त्याबद्दल सांगताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अरे माणूस गेल्यावर फोन करून काय उपयोग? माणूस जिवंत करण्यासाठी फोन केला पाहिजे ना. त्यावेळी मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अधिकाऱ्याचा फोन बिझी येत असल्याने मी विमानाच्या वैमानिकाला सांगितलं की, पाच मिनिटं थांब मला एक महत्त्वाचा फोन लावायचा आहे. त्यानंतर मी फोन लावला. विमानाचा पायलट १० मिनिटं थांबून होता. मी फोन केला, चर्चा झाली आणि दादाचा रिपोर्ट लगेच आला. माझा फोन वेळेवर गेला नसता तर काय उपयोग होता? सरकार हे लोकांना न्याय देण्यासाठी पाहिजे. लोक सरकारसाठी नसावेत, तर सरकार लोकांसाठी असले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मात्र, हा किस्सा सांगताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचं विमान हे हवेत होतं की जमिनीवर याचा नेमका खुलासा केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण एकनाथ शिंदे यांची फिरकी घेताना दिसत आहेत.मात्र मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने वायरल होतोय.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार