Black Tiger Viral Video
निसर्ग हे स्वतःमध्येच एक न सोडवता येणारं कोडं आहे. ते आपल्याला कधी कोणत्या रूपात आश्चर्यचकित करेल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ (video) सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. हा व्हिडीओ ओडिसा राज्यातील असून व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
आपल्याला कोणी विचारले की वाघ कोणत्या रंगाचा असतो, तर आपण लगेच उत्तर देऊ की वाघ पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. मात्र, तुम्ही कधी काळ्या रंगाचा वाघ पाहिला आहे का? ओडिशा व्याघ्र प्रकल्पामध्ये एक दुर्लभ वाघ पाहायला मिळाला आहे. या वाघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी निसर्गाच्या चमत्काराचे कौतुक करत आहेत.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “वाघ हे भारताच्या जंगलांच्या शाश्वततेचे प्रतीक आहेत… आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दुर्मिळ मेलानिस्टिक वाघाची एक मनोरंजक क्लिप शेअर करत आहे. व्याघ्र प्रकल्पात एक अतिशय अद्वितीय जनुक पूल असलेला एका वेगळा स्त्रोत लोकसंख्येच्या पुनर्प्राप्तीसाठी तयार आहे. कौतुक!” हा दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ ओडिशा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल क्लिपमध्ये, एक दुर्मिळ काळा वाघ त्याच्या प्रदेशावर चिन्हांकित करताना दिसत आहे. क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी तो प्रथम झाडाभोवती फिरतो आणि त्याला धोका आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो आपल्या पंजाने झाडावर खुणा करतो. वाघासारख्या प्राण्यांना त्यांचा प्रदेश चिन्हांकित करणे आवश्यक आहे कारण त्यांच्यामध्ये प्रदेशासाठी युद्ध होते.
त्याच वेळी, आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, ‘भारताचे काळे वाघ. सिमलीपालमध्ये स्यूडो-मेलानिस्टिक वाघ आढळतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे वाघ त्यांच्या अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे फार दुर्मिळ आहेत. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात २००७ मध्ये ते पहिल्यांदा दिसले होते.’ दरम्यान, सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला ५५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






