स्वा सै पं ध थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद व श्री स्वामी समर्थ केंद्र म्हसावद यांच्या संयुक्त विद्यमाने ” वृक्ष लागवड व संवर्धन संपन्न.

Spread the love

म्हसावद :- कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे श्री राकेश मकवाणे सह म्हसावद गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री गोविंदा पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र चिंचोरे ,श्री बापू धनगर, श्री प्रवीण पाटील, व म्हसावद श्री स्वामी समर्थ केंद्राचे श्री गणेश आमले व गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री एस बी सोनार सर, उपप्राचार्य श्री जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री एस के भंगाळे सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर ,शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या स्वागताने झााली

. तसेच श्री जी डी बच्छाव सरांनी आपल्या मनोगतातून वृक्ष संवर्धन आणि लागवड काळाची गरज आहे तसेच देशी वृक्षांमुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात असे सांगितले .तसेच प्रमुख अतिथी श्री राकेश मकवाणी सर यांनी आपल्या मनोगतातून अध्यात्मातून विज्ञानाकडे याबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच वड पिंपळ आंबा या वृक्षांचे महत्त्व सांगितले वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे याचे महत्त्व पटवून दिले.

आभार प्रदर्शन ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर यांनी केले सूत्रसंचालन श्री एस एम पिंगळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी प्रयत्न केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार