नागपंचमीच्या दिनी विद्यार्थ्यांना साप व पक्षांविषयी सर्पमित्र व पक्षमित्र यांनी केले प्रबोधन…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल येथे नागपंचमी च्या दिवसी विद्यार्थ्यांसाठी सर्प प्रबोधन शिबिर घेण्यात आले तसेच पक्ष्यांविषयी माहिती व त्याचे महत्वाचे फायदे तसेच आपली अन्नसाखळी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली.याप्रसंगी सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी सापांच्या विविध जाती विषयी व कोणता साप किती विषारी,कोणता बिनविषारी माहिती सांगताना मुलांना साप कसा हाताळावा याविषयी माहिती सांगितली व सापांचे फायदे व साप चावल्यानंतर काय काळजी घ्यावी याविषयी सर्व प्रबोधन केले साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र हे सर्वांना पटवून दिले.महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी व मी लोणारकर टीमचे सक्रिय सदस्य सचिन कापुरे यांनी अनेक पक्षांविषयी व पक्षांच्या फायद्याविषयी सापांना वाचवणे विषयी त्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांना पटवून दिले.

प्रसंगी फॉरेस्ट कडून ACF गवारे सर, RFO सावळे व वनरक्षक कैलास चौधरी तसेच वन्यजीव विभागाचे शिंदे साहेब,गोविंद मोरे तसेच सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे डोळे सर,जागृत सर,इंगळे सर व सर्व शिक्षक रुंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार