वाहतूक कोंडी समस्या बाबत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

Spread the love

उरण रायगड (हेमंत सुरेश देशमुख) उरण :- येथे उरण खोपटा गाव पूर्व विभाग वाहतूक कोंडी समस्या बाबत वाहतूक पोलिस निरीक्षक गायकवाड साहेब ह्यांच्या दालनात आज सकाळी 12.00 वाजता महत्त्वाची बैठक झाली मनसे चे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशजी ठाकूर साहेब तसेच ज्येष्ठ समाजसेवक संतोष पवार साहेब तसेच प्राचार्य मढवी साहेब

तसेच पुर्व गावातील सरपंच, गावातील कार्यकर्ते, तसेच सर्व गावाजवळील कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते ह्या कंपनीमध्ये काँटिनेंटल, ऑलकार्गो, अमेय, ग्लोबीकार्गो, विरगी कार्गो, तसेच इतर सर्व प्रकारचे कंपनीचे अधिकारी उपस्थित होते ह्या वेळी वाहतूक कोंडी बाबत दीर्घकाळ चर्चा झाली वाहतूक कोंडी बाबत कोणत्या उपाययोजना करता येतील ह्याबाबत प्रत्येकाने आपापल्या परीने विचार व्यक्त केले

वरीष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी गायकवाड साहेब ह्यांनी सर्व खाजगी कंपनीच्या अधिकारी ह्यांना सक्त सूचना देण्यात आल्या की प्रत्येक कंपनीने आपल्या तर्फे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी स्टाफ ठेवावा जणेकरून होणाऱ्या कोंडीवर लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा कडक अंमलबजावणी करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार