म्हासावद :- येथील थेपडे विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या नुसार सभा संपन्न झाली अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी. सोनार सर हे होते तसेच या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव सर पर्यवेक्षक श्री.एस.के.भंगाळे सर तसेच जेष्ठ नागरिक युवराज अण्णा ,शिक्षक पालक संघ सदस्य श्री.अभिलाष वामन पाटील व ग्रामपंचायत सदस्य श्री.बापू कौतिक धनगर आणि समस्त पालक व शिक्षक वृंद हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा श्री.एस.जे.पवार सर यांनी सांभाळली .
सभेच्या सुरवातीला ISRO येथे जाऊन आलेल्या कु. जानव्ही रवींद्र पाटील व दहावीला प्रथम आलेली कु. प्रेक्षा प्रविण शिरोळे या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीएस के भंगाळे सर सभेचे प्रास्ताविक केले. श्री बच्छाव सरांनी कार्यक्रमाला संबोधित करताना शालेय कामकाजाविषयी ची व पालकांना विद्यार्थ्यांसंबंधीचे अतिशय महत्त्वाचे मौलिक असे विचार मांडले. येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनामध्ये होणारा अमुलाग्र बदल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या सभेत पालकांनी ही विचार मांडले व त्यासंबंधी त्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
हे वाचलंय का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






