आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मोफत शस्त्रक्रियांना सुरुवात.

Spread the love


कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

पुणे :- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सुर्या हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सणसर येथे भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात जवळपास ३५० रूग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली होती.यामध्ये ज्या गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे त्यांना टप्याटप्याने शस्त्रक्रियाची तारीख देण्यात येईल.
आजपासून पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.

आमदार दत्तात्रय भरणे हे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असल्याचा प्रत्यय वारंवार इंदापूरकरांना येत असतो.आजवर श्री.भरणे यांनी असंख्य गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तत्परतेने केलेली आहे तर कित्येक रूग्णांवर मुंबई-पुणे येथील नामांकित दवाखान्यात लाखो रूपयांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून दिलेल्या आहे.


यामुळेच ते एक प्रकारचे आरोग्यदूत म्हणूनच जनतेच्या मदतीला उतरत आहेत.आज श्री.भरणे यांच्या मदतीने २ लाखांची शस्त्रक्रिया मोफत पार पडली.
मौजे.घोलापवडी (पवारवाडी) ता.इंदापूर येथील सामान्य कुटुंबातील सौ.नंदा शिवाजी घोलप यांच्यावर आज सकाळी मोफत एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आली .


या ठिकाणी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे व पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ यांनी सौ.घोलप यांची दवाखान्यात प्रत्यक्ष भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.


यावेळी सौ.घोलप यांनी सांगितले की,भरणे मामांमुळे माझी शस्त्रक्रिया अगदी मोफत पणे पार असून यामुळे मी अतिशय समाधानी आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार