हायप्रोफाईल खटले लढवणारे उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीला, तर्कवितर्कांना उधाण

Spread the love

Shinde VS Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट; ‘नंदनवन’ निवासस्थानी रात्री झालेली भेट चर्चेत

Ujjwal Nikam meets CM Eknath Shinde | सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उज्ज्वल निकम हे एकनाथ शिंदे गटासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावणार का, याविषयी आता चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांनी भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, एकनाथ शिंदे भविष्यात त्यांच्यावर एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवतात का, हेदेखील पाहावे लागेल.

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी घेण्याचं जाहीर केलंय. आम्हीच मूळ शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला असला तरी, न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणताही ठोस निर्णय घेऊ नये, असे निर्देश गुरुवारी न्यायालयाने दिले. या सुनावणीनंतर ही भेट झाल्याने कायदेशीर प्रक्रिया आणि या खटल्यासंदर्भात निकम यांच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाणे : – एकेकाळी राज्यातील हायप्रोफाईल खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उज्ज्वल निकम हे गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे कायदेशीर वर्तुळात उज्ज्वल निकम यांचा एक आदरयुक्त दरारा होता. एखादा खटला त्यांच्याकडे गेला की त्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागणार, असे जवळपास गृहीतच धरले जायचे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उज्ज्वल निकम हे एकनाथ शिंदे गटासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावणार का, याविषयी आता चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांनी भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, एकनाथ शिंदे भविष्यात त्यांच्यावर एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवतात का, हेदेखील पाहावे लागेल.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटल्याने सत्तांतर झाले होते. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला होता. त्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता आणि शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरून कायदेशीर लढाई सुरु आहे. या सगळ्या नाट्यादरम्यान उज्ज्वल निकम हे अनेकदा प्रसारमाध्यमांमधून कायदेशीर पैलू उलगडताना दिसत होते. त्यांनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चांदरम्यान पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणार का, हेदेखील पाहावे लागेल.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार