Video Virel : पोटच्या 4 वर्षाच्या मुलीला आईने चौथ्या मजल्यावरून फेकलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Spread the love

माता न तू वैरिणी: पोटच्या मुलीला आईनेचं संपवलं, मन हेलावून टाकणारी घटना

बंगलोर : – आई ही मुलांची सर्वात मोठी रक्षक मानली जाते. कारण आई फक्त मुलाला जन्म देत नाही तर त्याचे संगोपनही करते. आई आणि मुलाच्या प्रेमावर बरंच काही लिहिलं गेलं आहे, मात्र कर्नाटकातून मन सुन्न करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये  महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.  या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उत्तर बेंगळुरूच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये ही भीषण घटना घडली.

“आम्ही अद्याप आईची मानसिक स्थिती काय आहे आणि तिने हे का केलं हे शोधत आहोत. आत्तापर्यंत प्रथमदर्शनी तक्रारीच्या आधारे आम्ही आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असं पोलिसांनी यावेळी सांगितलं. मुलाला अपंगत्व असून त्याचे ऐकणे आणि बोलणे कमजोर होते. सुषमा यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या याच मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांची मुलगी ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे महिला नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

ती महिला डेंटिस्ट आहे आणि तिचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, आम्ही आईच्या मानसिक आरोग्याबाबत सर्व बाजूंनी विचार करत आहोत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार