Health Tips : जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे…
दिवसभराची धावपळ, ताण (Stress) आणि थकवा यामुळे आपण सर्वंचजण रात्री कंटाळतात. दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरुणावर झोपण्याचा एक खास आनंद असतो. लोक त्यांच्या सोयीनुसार बेड तयार करतात. काहीजण पातळ गादीवर झोपणे पसंत करतात, तर काही लोकांना जाड गादीवर झोपणे आवडते. अनेक वेळा पाठदुखीमुळे (Back pain) काही लोक पातळ गादी बनवतात. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तज्ञांच्या मते 8 तासांची झोप पूर्ण करण्यासाठी झोपेसंदर्भात काही टिप्स फाॅलो करणे अत्यंत महत्वाचे आहे. बेड आणि गादीवर झोपण्याऐवजी कधीही जमिनीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Health Tips : आजकाल बाजारात अनेक आरामदायक बेड उपलब्ध असले तरी गणेश चतुर्थी असो वा नवरात्री तसेच दिवाळी, काही लोक या उत्सवांमध्ये जमिनीवर झोपतात. यामागे काही धार्मिक भावना असल्यातरी जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे…
बॉडी पोश्चर चांगलं होतं
जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगलं तर वाटतं पण त्याने बॉडी पोश्चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्चर चांगला राहतो.
हाडांच्या संरचेनत सुधारणा होते
जमिनीवर झोपल्याने वाकडी-तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थितीत येतात आणि त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू गतीने होते पण भविष्यात याचे अनेक फायदे बघायला मिळू शकतात. खाली जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइंट्समध्ये काही इजा झाली असेल तर ती सुद्धा याने बरी होऊ शकते.
पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या दूर होते
जमिनीवर झोपल्याने तुमचा स्पाइन म्हणजेच पाठीचा कणा सरळ होतो आणि त्यावर दबाव सुद्धा कमी पडतो. इतकेच नाही तर असे केल्याने तुम्हाला पाठीच्या कण्यासंबंधी समस्याही होणार नाहीत. पाठीचा कणा हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो शरीराच्या पूर्ण नर्व सिस्टीमला कंट्रोल करतो आणि याचा थेट संपर्क हा मेंदुशी असतो.
पाठदुखीपासून मिळतो आराम,पाठीचा कणा मजबूत होतो
खाली जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहित असल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. आणि हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा जाड गादीवर झोपल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. अशात खाली जमिनीवर झोपल्याने ही समस्या होणार नाही.
हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर
जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचं अलायमेंट चांगलं होतं आणि शरीरातील अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमच्या खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल.
रक्ताभिसरण
शरीरातील रक्ताभिसरण बरोबर असेल तर स्नायूंना आराम मिळतो. तज्ज्ञांच्या मते जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूला आराम मिळतो. म्हणूनच तुम्हीही रोज जमिनीवर झोपायला सुरुवात करा, सुरुवातीचे काही दिवस त्रास होईल. पण एकदा का तुम्हाला याची सवय झाली की तुमच्या शरीराचे सर्व आजार दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.
शरीराला थंडावा मिळतो
उन्हाळ्यात जर तुमच्या शरीराचं तापमान वाढलं तर तुम्हाला घाम येतो आणि झोपमोड होते. जेव्हा तुम्ही गुबगुबीत गादीवर झोपता तेव्हा ओव्हर हिटिंगमुळे तुम्हाला शांत झोप येत नाही. मात्र अशा वेळी जर तुम्ही जमिनीवर साधं पांघरून टाकून झोपला तर तुम्हाला मुळीच त्रास न होता शांत झोप लागते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






