आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने चित्रकला स्पर्धा संपन्न

Spread the love

धरणगाव / प्रतिनिधी

धरणगाव ( पिंप्री खु ) :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने देशभरात असंख्य सामाजिक ,सांस्कृतिक , व देशातील सर्व नागरिकांचा सहभाग घेत अमृत पर्व साजरे केले जात आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर वीर , देशभक्त , महापुरुष यांचे योगदानाबद्दल त्यांच्या सन्मान प्रति आपण ऋण व्यक्त करतो.

चित्रकला स्पर्धा…

आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खु येथे स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्ती व्यक्त करत भारतीय इतिहास , सैनिक बांधवांचे बलिदान , नवं भारत , ऐतिहासिक स्थळ यांच्यावर भारतीय ध्वज व देशाविषयी अभिमान व्यक्त केला .
प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सप्ताहात विविध उपक्रम आयोजन केले असुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार