भर पावसात एरंडोल येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण….

Spread the love

एरंडोल :- 1जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला  अभिवादन करण्यासाठी देशभरातून  लाखोच्या संख्येने आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला केला गेला, दगडफेक केली,  गाड्यांची काचा फोडून जाळपोळ करण्यात आली.

   या दंगलीचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी जनतेने भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात आयोग नेमला जावा अशी मागणी केली.तत्कालीन महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दंगली संदर्भात आयोग तर नेमला पण महाराष्ट्र सरकारने या आयोगाला कोणत्याच प्रकारचा साथ सहयोग दिला नाही.


  

तसेच भीमा कोरेगाव चौकशी आयोगा समोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये पोलीस प्रशासनाद्वारे सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करून पुरावे संपवले जात आहेत. या विरोधात भारत मुक्ती मोर्चा च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चरणबद्ध आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून   एरंडोल तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण सकाळी १० वा.पासून ते सायंकाळी ५ वा. पर्यंत करण्यात आले.

यावेळी सर्व  सामाजिक  चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी, भीमसैनिक, बौद्ध बांधव यांनी विनम्रपणे अंदोलनाला साथ सहयोग  करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी उपस्थित समाज बांधवांतर्फे व बी एम पी कार्यकर्त्यांतर्फे एरंडोल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भारतमुक्ती मोर्चा  प्रभारी तालुका प्रतिनिधी – आयु. नंदलाल आगारे सर, ज्येष्ठ समाजसेविका तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार मॅडम, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार दक्षता नियंत्रण समिती सदस्य आयु. सूनीलजी खोकरे, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष – आयु. प्रकाशभाऊ शिंदे ,भारत मुक्ती मोर्चा एरंडोल तालुकाध्यक्ष सागरभाऊ बोरसे, जवखेडे बु. बी.एम.पी.अध्यक्ष आयु. आनंद सूर्यवंशी व शुभम सूर्यवंशी जवखेडे खु. आयु. बुद्धभूषण पवार,आयु.निवृत्ती सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आयु. संघरत्न गायकवाड, मोहन सैंदाणे, सामाजिक कार्यकर्ते आयु.देवानंद बेहरे, पत्रकार -आयु.कैलास झाल्टे, व मोठया संख्येने समाज बांधवांनी  भारत मुक्ती मोर्चा या तर्फे आज दिनांक 8 / 8 /2022 रोजी लाक्षणिक उपोषण करून एरंडोल तहसील आवारात भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाज बांधव हे उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार