धक्कादायक ; रक्षाबंधनाला घेण्यासाठी आलेल्या भावास दिसला बहिणीचा मृतदेह,गेल्या वर्षीच झाला होता विवाह.

Spread the love

पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज एक २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रिया शहा देव (वय २६, रा. भोपाल, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही. तिचा घातपात झाल्याचा संशय मयत विवाहितेच्या भावाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ?

प्रिया देव हिचा विवाह एम.एस.एफ.मध्ये सेवेत असलेले पाचोरा येथील विनोद सुरवाडे रा. गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचेशी पाचोरा येथे दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान विवाह झाल्यापासुन पती – पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती.दि. ७ ऑगस्ट रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच भांडण सुरू झाले होते.

याच दिवशी प्रिया हिने रात्री ९ ते १२ वाजेला टप्प्या टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली.दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथुन दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले.

दरम्यान याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पुर्व सुचना देखील दिली होती. मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी ह्या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेले असता प्रिया हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.यावेळी प्रिया हिच्या भावाने एकच हंबरडा फोडला. तसेच माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही.

असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पाचोरा पोलिस काय भुमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.

भाऊ पोहचला अन्‌

भाऊ देवेन देव त्याने येत्या दोन, तीन दिवसांवर रक्षाबंधन आहे, त्यासाठी प्रियाला घेऊन येऊ व तिच्या पतीसह सासरच्या समजवू, असा विचार केला. देवेन देव आपले मेहुणे शशांक शेजवाल यांना घेऊन रविवारी (ता. ७) रात्री पाचोरा येण्यास निघाले. आम्ही येत आहोत, असे त्याने बहीण प्रियालाही कळवले होते. देवेन व शशांक हे दोघे आज (ता. ८) पहाटे पाचोरा येथे पोहोचले. याच वेळी विनोदची मामी प्रियाला उठवण्यासाठी गेली असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. याच वेळी मृत प्रियाचे भाऊ व मेहुणे हे घरी पोहोचले. बहिणीला घेण्यासाठी आलो आणि तिचा मृतदेह पाहायला मिळाला हे पाहून भाऊ देवेन याने हंबरडा फोडला व बहीण आत्महत्या करूच शकत नाही, तिची हत्या झाल्याचा आरोप करत त्याने चौकशी व कारवाईची मागणी केली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार