सुलतानपूर ग्रामपंचायत ने केला संकल्प हर घर तिरंगा!

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार तालुक्यातील सुलतानपूर दिनांक-
८/८/२०२२ रोज सोमवारला ठीक अकरा वाजता ग्रामपंचायत सुलतानपूर च्या वतीने सरपंच च.न.अवचार यांच्या अध्यक्षतेखाली संतोष शिरसागर ग्रामविस्तार अधिकारी ग्रामपंचायत सुलतानपूर यांच्या मार्गदर्शनात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये सर्वानुमते पर्यटन व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे शासन निर्णय/ परिपत्र का नुसार भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक १३ ऑगस्ट ते दिनांक१५ ऑगस्ट२०२२ या कालावधीमध्ये” हर घर तिरंगा” व दिनां क ९ ऑगस्ट२०२२ ते दिनांक१७ ऑगस्ट २0२२ या कालावधीमध्ये” स्वराज्य महोत्सव ” साजरा करण्याचे नियोजन आहे त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्व घटकांच्या सहभागातून व लोकसहभागातून हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला पूर्ण गावांमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा आपला राष्ट्रीय झेंडा सन्मानाने स्वाभिमानाने शासकीय नियमानुसार लावण्यात यावा.

ध्वज हाताने काढलेल्या विणलेल्या किंवा मशीनद्वारे सूट पॉलिस्टर सिल्क खादी लोकर पासून तयार केलेले राष्ट्रीय ध्वज वापरा राष्ट्रीय ध्वजाचा आकार,३+२ या प्रमाणात असावा केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा राष्ट्रध्वज उतरवताना सावधानतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा- राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी- प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे- प्लास्टिक किंवा कागदी झेंडा वापरू नये कोणतेही सजावटी वस्तू लावू नयेत- तसेच राष्ट्रध्वज फडकव ती वेडी फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास मनाई आहे .

राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये- राष्ट्रध्वज फाटलेला किंवा मळलेला अथवा चुरगळलेला लावू नये – एकाच वेळी इतर ध्वजा सोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये – तोरण- गुच्छ अथवा पताका म्हणून कोणत्याही प्रकारे शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करू नये – असे नियम सर्वांना याठिकाणी समजावून सांगण्यात आले तसेच वार्ड ५ आणि ६ चे सर्व समस्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन सुद्धा या ठिकाणच्या जमलेल्या महिलांना देण्यात आले

या बैठकीसाठी ग्रा.पं. सदस्य पंजाबराव पनाड,संतोष शिंदे,जाकिर पठाण,नवीन शहा,शेख मुसब्बर भाई,जिल्हा उपाध्यक्ष कि.स.मारोतराव सुरूशे भाजपा लोणार तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, सुभाष भानापुरे,भाई अशोक जावळे,रिपब्लिकन सेना लोणार तालुका अध्यक्ष महेंद्र पनाड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते महेश पनाड,गजानन पनाड,विशाल पनाड,सौ निर्मला नालिंदे,ज्योती राऊत, रेणुका सुरुस,सुनिता पनाड, संगीता बोरकर,जाबेदा बी हमीदा बी,तसलिमा बी,छाया जावळे,ज्योती वाकोडे इत्यादी महिला सुद्धा उपस्थित होत्या

हे वाचलंत का ?

टीम झुंजार