पी एम किसान सन्मान निधी संदर्भात पटवारी संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- दिनांक 29 ऑगस्ट रोजी विदर्भ पटवारी संघ यांनी पी एम किसान डाटा अपलोडिंग काम 37 मुद्दा मध्ये करायचे या बाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना भेटुन चर्चा करुन निवेदन देण्यात आले,की प्रत्येक तालुक्यामध्ये महसुल,ग्रामविकास,कृषी या तिन्ही विभागांच्या कर्मचारी संख्येनुसार गावांची विभागणी करण्यात यावी व त्या प्रमाणे काम करण्यात यावे.डाटा अपलोडींग साठी प्रथम सर्व कर्मचार्‍यांना परिपुर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावे.

सदर कामाची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यत करण्यात यावी.सदर काम हे कॅम्प लावून कार्यालयीन वेळेतच करण्यात यावे.सुट्टीच्या व सणांच्या दिवशी कामाची सक्ती करण्यात येवु नये.


या संदर्भातील निवेदन देण्यात आले यावेळी विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र हिम्मतराव धोंडगे व विदर्भ पटवारी जिल्हा सचिव अनिल जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार