लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- दिनांक 29 ऑगस्ट रोजी विदर्भ पटवारी संघ यांनी पी एम किसान डाटा अपलोडिंग काम 37 मुद्दा मध्ये करायचे या बाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना भेटुन चर्चा करुन निवेदन देण्यात आले,की प्रत्येक तालुक्यामध्ये महसुल,ग्रामविकास,कृषी या तिन्ही विभागांच्या कर्मचारी संख्येनुसार गावांची विभागणी करण्यात यावी व त्या प्रमाणे काम करण्यात यावे.डाटा अपलोडींग साठी प्रथम सर्व कर्मचार्यांना परिपुर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावे.
सदर कामाची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यत करण्यात यावी.सदर काम हे कॅम्प लावून कार्यालयीन वेळेतच करण्यात यावे.सुट्टीच्या व सणांच्या दिवशी कामाची सक्ती करण्यात येवु नये.
या संदर्भातील निवेदन देण्यात आले यावेळी विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र हिम्मतराव धोंडगे व विदर्भ पटवारी जिल्हा सचिव अनिल जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






