जळगाव : – गणपती विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कांताई बंधाऱ्यात घडली. भगवान नामदेव राठोड (वय-१८, रा. समता नगर जळगाव) असं मृत तरूणाचं नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई आणि मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत भगवान राठोड हा गिरणा नदीवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणांसोबत भगवान देखील पाण्यात उतरला. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून तो पडला.
यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर भगवानला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. मृत भगवान राठोड याच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






