आक्षेपार्ह वक्तव्य भोवले ; एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित ; महानिरीक्षकांची कारवाई , पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांची माहिती

Spread the love


जळगाव,(प्रतिनिधी) : -.  मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरुन हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी निलंबन केले आहे. तसेच बकाले यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिनांक १४ रोजी माध्यमांना दिली आहे.

पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की,पोलीस निरीक्षक, किरणकुमार भगवानराव बकाले, हे दिनांक ०१.११.२०२० पासून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे नेमणूकीस असतांना, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूकीचे एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदणीय व विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची मोबाईलवरील संभाषणाची ऑडीओ क्लीप व्हायरल झालेली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतांना. उच्च नैतिक मुल्ये बाळगुन. लोकांप्रती सौजन्य आणि सहवर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असे असतांनाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला आहे.

पहा व्हिडिओ :

व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जावून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर संभाषण असलेला पेन ड्राईव्ह यासोबत जोडला आहे.

तरी श्री. किरणकुमार भगवानराव बकाले, नेम स्था. गु. शा. जळगाव यांच्या सदर अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व गैरशिस्त वर्तनाची सखोल प्राथमिक चौकशी करून कसूरीचे अनुषंगाने आवश्यक जाबजबाब व दस्तऐवजी पुरावे जमा करावेत व त्याबाबतचा अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह दिनांक २२.०९.२०२२ पावेतो पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे मार्फतीने या कार्यालयास सादर करावा असे नमूद करण्यात आले आहे.

हे वाचलंत का ?


टीम झुंजार