एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-

Spread the love

अवैध धंदे, चोर्‍या, हाणामारी, तस्करी वाढली-पोलिस करतात तरी काय ?- सवाल

एरंडोल (विशेष प्रतिनिधी) – एरंडोल अतिशय शांत असले तरी अलिकडच्या काळातील हाणामारी, चोर्‍या या घटना पाहता शांत एरंडोलला कुणाची तरी दृष्ट लागली की काय ? असा सवाल महिलांसह नागरीकांना पडला असून शासन-प्रशासन, पोलिस यांनी झोपेतून जागे व्हावे अशी अपेक्षा आहे.

सविस्तर वृत्त असे की, एरंडोल शहरातील गांधीपुरा आणि गाढवे गल्ली परिसरातील घटना पाहता पोलिसांचा गुन्हेगारांवर काहीच वचक नाही का ? अशी चर्चा सर्वत्र असली तरी सुध्दा परवाच्या अंत्ययात्रेतील श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करतांना जे समजले ते भयानक वास्तव असून शहरातील नंबर एकपेक्षा नंबर दोनचीच चर्चा अधिक असून पैसा फेको तमाशा देखो याचीच जास्त चर्चा रंगली होती. कारण गांधीपुरा भागातील अल्पवयीन मुलाने कोणताही विचार न करता म्हणण्यापेक्षा माझे आणि माझ्या कुटूंबाचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. या भावनेने एकावर चाकू हल्ला झाला. सुदैवाने युवक बचावला. कारण मात्र क्षुल्लक होते. सायकल का पाडली ? तर अलिकडील गाढवे गल्लीतील घटना देखील किरकोळच. कारण होते मोटार सायकल का लावली ? यावरून वाद झाला आणि त्यास तीन दिवसानंतर जीव गमवावा लागला. त्यामुळे पैसे दिल्यानंतर-अथवा चारल्यानंतर आमचे काहीच होवू शकत नाही अशी तर भावना नसावी ना ?

याबाबत मात्र शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सदर बाबतीत युवा आमदार अमोलदादा पाटील यांचे कानावर देखील अवैध धंदे, चोर्‍यां (दिवसा आणि रात्रीदेखील) बाबत तक्रारी घातल्या असून देखील पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.
शहरात एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे असून देखील एकच कार्यान्वित असून 24 सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांनीच यापूर्वी स्पष्ट केले होते. जर सीसीटीव्ही असते तर मारामार्‍या, गुन्हेगारी वाढल्या नसत्या अशी चर्चा असून प्रतिनिधी, आमदारांनी आतातरी लक्ष घालावे हीच यानिमित्ताने अपेक्षा कारण चोर्‍यांचे प्रमाण वाढत असून तपास मात्र शून्य असल्याचे समजते.

मुख्य संपादक संजय चौधरी