रावेर : – रावेर तालुक्यातीलचिनावल-उटखेडा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली आज दि. १६ सप्टेंबर शुक्रवारी रोजी सकाळी तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, हे बैल लंपीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने ? याची माहिती अद्याप कळलेली नाही. या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का ? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या मजुरांना पुलाजवळ दुर्गंधी आल्याने त्यांनी येथे दुर्गंधी कशी येत आहे या बाबत बघितले असता हा प्रकार उघडकीस आला, सदरचा प्रकार चिनावल गावात वाऱ्यासारखा पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली, घटनास्थळी निंभोरा व सावदा येथील पोलिसांनी पुलापासून तब्बल एक ते दीड किमी अंतर वाहून गेलेल्या बैलाना चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले. या कामी चिनावल येथील श्रीकांत सरोदे, हितेश भंगाळे, योगेश पाटील, निलेश गारसे, विशाल बोरोले, गजू साळुंके, किरण महाजन, वैभव नेमाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ लहासे, यांनी सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






