(झुंजार प्रतिनिधी योगेश पाटील)
धरणगाव : युनियन बँक ऑफ इंडिया धरणगाव शाखेचे व्यवस्थापक श्री.मोरे यांच्या विरोधात शेतकऱ्याने आमरण उपोषण आज पासुन सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की योगेश रामलाल पुरभे हे धरणगाव येथे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगांव शाखेचे जुने खातेदार आहेत. सालाबादप्रमाणे योगेश पुरभे यांनी शेतीसाठी नियमित पीककर्ज घेतलेले होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला भरली होती.
ऑगस्ट महिन्यात युनियन बँकेचे व्यवस्थापक श्री. भुषण मोरे साहेब यांना पीक कर्ज संदर्भात मागणीसाठी योगेश पुरभे गेले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की प्रकरण तयार करुन आणा आम्ही लगेच लवकरात लवकर पीक कर्ज मंजूर करून देतो. त्या नंतर योगेश पुरभे श्री. मोरे साहेब यांच्याकडे वारंवार गेले असता त्यांनी योग्य तो प्रतीसाद न देता श्री. पुरभे यांना डावलण्याचा प्रयत्न केला.
आता खरंच शेतकरी योगेश पुरभे यांना कर्जाची गरज होती कारण त्यांनी अनेकांकडून उसनवारी पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांना बँक मदत करेल असे वाटत होते परंतु ते प्रयत्न करूनही जर जगाचा पोशिंदा आर्थिक विवंचनेत असेल तर काय उपयोग त्यामुळे श्री.योगेश पुरभे यांनी युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापक श्री. मोरे यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध सोमवार पासून उपोषणास सुरूवात केली आहे.
या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख श्री.गुलाबराव वाघ यांनी व्यवस्थापक यांना भेटून लवकरात लवकर शेतकरी हिताचा योग्य तो निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा असे प्रतिपादन केले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






