सोलापूर :- राधिका नामदेव भोसले यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त्त. गाव -बोरगाव तालुका-माळशिरस जिल्हा-सोलापूर

कोणी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कितीही मोठा माणुस बनला तरी त्याला त्याच्या आयुष्यातील त्याला आकार देणाऱ्या अंगणवाडी ला आणि त्यातील त्याच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे अंगणवाडी सेविका यांच योगदान नाकारून चालणार नाही.अंगणवाडी इथुनच त्या लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची गोडी निर्माण होती.आणि त्या विद्यार्थ्यांना आयुष्यात एक चांगला माणुस घडवायचं काम अंगणवाडी सेविका करत असतात. अश्याच बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथील अंगणवाडी सेविका.राधिका नामदेव भोसले यांनी त्यांच्या आयुष्यातील 26 वर्ष गाव-बोरगाव या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणुन तेथील लहान मुलांना भविष्यातील आदर्श माणुस घडवायचं काम केलं आहे.आज त्यांना जिल्हा परिषद सोलापुर महिला व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मिळाला.
आयुष्यात त्यांनी 26 वर्ष लहान विद्यार्थ्यांना घडवायचं प्रामाणिक पणे काम केले.त्यांच्या प्रामाणिक पणे केलेल्या कामाची ही पोहोच पावतीच मिळाली अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराने नातेवाईकांसह,सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.