राधिका नामदेव भोसले यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त

Spread the love


सोलापूर :- राधिका नामदेव भोसले यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त्त. गाव -बोरगाव तालुका-माळशिरस जिल्हा-सोलापूर

आयुष्यात शिक्षण घेऊन कोणी कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्या व्यक्तीला लहानपणी शिक्षणासाठी प्रेरित करायचं काम.त्याला चांगले सु-संस्कार घडवायचं काम कोण करत असेल तर ती म्हणजे अंगणवाडी सेविका.कुंभार ज्या प्रमाणे चांगलं मडकं तयार व्हावं म्हणून मडक्यालात आकार देतो.तो कुंभार मडक्याला आकार देताना कुठेही कमी पडत नाही.त्याची सर्व बुद्धी त्याठिकाणी लावतो.त्याचप्रमाणे या लहान विद्यार्थ्यांना त्त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुयोग्य आकार देण्याचं काम त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून द्यायचं काम हे कोनाचं असेल तर ते त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रथम शिक्षणाची पायरी म्हणजे अंगणवाडी होय.आणि अंगणवाडी सेविका ह्यांचंच होय.


कोणी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कितीही मोठा माणुस बनला तरी त्याला त्याच्या आयुष्यातील त्याला आकार देणाऱ्या अंगणवाडी ला आणि त्यातील त्याच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे अंगणवाडी सेविका यांच योगदान नाकारून चालणार नाही.अंगणवाडी इथुनच त्या लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची गोडी निर्माण होती.आणि त्या विद्यार्थ्यांना आयुष्यात एक चांगला माणुस घडवायचं काम अंगणवाडी सेविका करत असतात. अश्याच बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथील अंगणवाडी सेविका.राधिका नामदेव भोसले यांनी त्यांच्या आयुष्यातील 26 वर्ष गाव-बोरगाव या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणुन तेथील लहान मुलांना भविष्यातील आदर्श माणुस घडवायचं काम केलं आहे.आज त्यांना जिल्हा परिषद सोलापुर महिला व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मिळाला.
आयुष्यात त्यांनी 26 वर्ष लहान विद्यार्थ्यांना घडवायचं प्रामाणिक पणे काम केले.त्यांच्या प्रामाणिक पणे केलेल्या कामाची ही पोहोच पावतीच मिळाली अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराने नातेवाईकांसह,सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार