मुंबई : – कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दिवशी तरुणांनी दांडियावर ठेका धरला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.
इथे पहा व्हिडिओ :
यावेळी नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. नवनीत राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. यावेळी गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे वाचलंत का ?
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले
- अनेक दशकांचा प्रतीक्षेनंतर पिंप्री पूल ग्रामस्थांचा रहदारीस खुला…..आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते पिंप्री ते मोंढाळे पुलाचे झाले लोकार्पण…
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून एरंडोल आगारास ५ नवीन बसेस उपलब्ध…
- एरंडोल तालुक्यात वादळाचा कहर दोन नागरिकांनी गमावला आपला जीव; वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून वीज पुरवठा केला सुरळीत.