मुंबई : – कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दिवशी तरुणांनी दांडियावर ठेका धरला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.
इथे पहा व्हिडिओ :
यावेळी नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. नवनीत राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. यावेळी गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.