चोपडा :- सध्या महाराष्ट्रात महिला गैरवर्तन करणाच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला प्रेम पण करावे लागेल, लग्न पण करावे लागेल अशी भर रस्त्यात धमकी देत मुलीला चापटांनी मारहाण करत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात घडली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने चोपडा पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सागर दगडु पाटील,रा. मल्हारपुरा, चोपडा ता. चोपडा यास अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, आरोपी याने पिडीत फिर्यादी सोबत वैयक्तीक प्रेमसंबंध निर्माण करण्याचे वाईट उद्देशाने पिडीत मुलगी चोपडा शहरात जान्हवी कलेक्शन, बालमोहन कॉलेज मध्ये व एम. जी. कॉलेज येथे जात असतांना तीचा वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर आरोपीताचा पिडीत फिर्यादी मुलीस वेळोवेळी संपर्क साधुन पिडीत फिर्यादी मुलीची ईच्छा नसतांना आरोपी याने तिस बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास सांगुन पिडीत फिर्यादी मुलगी हिने आरोपीताचे भितीपोटी ईच्छा नसतांना देखील आरोपीताशी प्रेमसंबंध ठेवले.
नंतर आरोपीताकडून फिर्यादी मुलीस होण्याऱ्या त्रासामस कंटाळुन प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने याचा आरोपीतास राग आल्याने दिनांक २७/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा सुमारास एम. जे. कॉलेज चोपडा येथे पिडीत फिर्यादी मुलगी हि कॉलेजला आलेली असतांना आरोपी याने पिडीत फिर्यादी मुलीस तु माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर धमकावले तुझे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करुन तुझी बदनामी करुन टाकील अशी धमकी देवुन फिर्यादीचा हात पकडुन तुला माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल असेल बोलुन फिर्यादीची मनास लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारे गैरकृत्य करुन चापटांनी मारहाण केली म्हणुन भाग-५गु.र.नं.४०२ / २०२२ भा.द.दि. कलम ३५४ (अ) (१ ), ३५४ (ड) ३२३, ५०६, सहपोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अजित सावळे नेम चोपडा शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- Viral Video:रील बनविण्यासाठी एक महिला जीव धोक्यात घालून खोल दरीतील झाडाच्या पातळ खोडावर नाचू लागली, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का.
- धक्कादायक! प्रियकराला आला ‘तो’ संशय म्हणून प्रेयसीला स्क्रूड्रायव्हरनं तब्बल ४० वेळा भोसकलं गुप्तांगावरही केले वार.
- निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पत्नीने स्वतःच्या पतीला दाखविला मयत, 8 वर्ष योजनेचा घेतला लाभ,अचानक पती जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात काय आहे प्रकरण वाचा.
- बहिणीच्या दिराशी पळून जात केलं लग्न, सासरच्यांकडून मुलगी झाली म्हणून शारीरिक मानसिक छळाला कंटाळून ३ वर्षाच्या चिमुकलीला सोडून गर्भवती आईने दिला जीव.
- श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी कटिबद्ध: आमदार अमोलदादा पाटील; २३ कोटींच्या विकासकामांची पाहणी