चोपडा :- सध्या महाराष्ट्रात महिला गैरवर्तन करणाच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला प्रेम पण करावे लागेल, लग्न पण करावे लागेल अशी भर रस्त्यात धमकी देत मुलीला चापटांनी मारहाण करत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात घडली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने चोपडा पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सागर दगडु पाटील,रा. मल्हारपुरा, चोपडा ता. चोपडा यास अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, आरोपी याने पिडीत फिर्यादी सोबत वैयक्तीक प्रेमसंबंध निर्माण करण्याचे वाईट उद्देशाने पिडीत मुलगी चोपडा शहरात जान्हवी कलेक्शन, बालमोहन कॉलेज मध्ये व एम. जी. कॉलेज येथे जात असतांना तीचा वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर आरोपीताचा पिडीत फिर्यादी मुलीस वेळोवेळी संपर्क साधुन पिडीत फिर्यादी मुलीची ईच्छा नसतांना आरोपी याने तिस बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास सांगुन पिडीत फिर्यादी मुलगी हिने आरोपीताचे भितीपोटी ईच्छा नसतांना देखील आरोपीताशी प्रेमसंबंध ठेवले.
नंतर आरोपीताकडून फिर्यादी मुलीस होण्याऱ्या त्रासामस कंटाळुन प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने याचा आरोपीतास राग आल्याने दिनांक २७/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा सुमारास एम. जे. कॉलेज चोपडा येथे पिडीत फिर्यादी मुलगी हि कॉलेजला आलेली असतांना आरोपी याने पिडीत फिर्यादी मुलीस तु माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर धमकावले तुझे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करुन तुझी बदनामी करुन टाकील अशी धमकी देवुन फिर्यादीचा हात पकडुन तुला माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल असेल बोलुन फिर्यादीची मनास लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारे गैरकृत्य करुन चापटांनी मारहाण केली म्हणुन भाग-५गु.र.नं.४०२ / २०२२ भा.द.दि. कलम ३५४ (अ) (१ ), ३५४ (ड) ३२३, ५०६, सहपोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अजित सावळे नेम चोपडा शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






