झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
गोतोंडी :- ( ता. इंदापूर ) सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जडणघडणीत उल्लेखनीय योगदान असणाऱ्या गोतोंडी गावचे ज्येष्ठ समाज सुधारक अर्जुन ( बापू ) बनसोडे ( वय वर्षे ७६ ) यांचे नुकतेच रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. दुःखद निधनाची बातमी समजतात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बनसोडे कुटुंबीयांची भर पावसात भेट घेऊन शोक व्यक्त करत स्वर्गीय बापूंच्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे एक चिरंजीव तात्याराम बनसोडे सोनाई डेअरी मध्ये सुपरवायझर म्हणून काम पाहतात तर दुसरे चिरंजीव अशोक बनसोडे सहशिक्षक म्हणून दगडू दादा बनसोडे विद्यालय येथे कार्यरत आहेत. मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा तात्या भरणे यांचे ते जवळचे सहकारी मित्र होते.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……