मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून बनसोडे कुटुंबीयांचे सांत्वन..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


गोतोंडी :- ( ता. इंदापूर )
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जडणघडणीत उल्लेखनीय योगदान असणाऱ्या गोतोंडी गावचे ज्येष्ठ समाज सुधारक अर्जुन ( बापू ) बनसोडे ( वय वर्षे ७६ ) यांचे नुकतेच रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. दुःखद निधनाची बातमी समजतात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बनसोडे कुटुंबीयांची भर पावसात भेट घेऊन शोक व्यक्त करत स्वर्गीय बापूंच्या आठवणींना उजाळा दिला.


त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे एक चिरंजीव तात्याराम बनसोडे सोनाई डेअरी मध्ये सुपरवायझर म्हणून काम पाहतात तर दुसरे चिरंजीव अशोक बनसोडे सहशिक्षक म्हणून दगडू दादा बनसोडे विद्यालय येथे कार्यरत आहेत. मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा तात्या भरणे यांचे ते जवळचे सहकारी मित्र होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार