जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणाऱ्या गुणवंत पाटील (वय २६, रा.डोंबिवली, जि.ठाणे) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १० वाजता झाला. मयताची पूर्ण ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती. या अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले आहे. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. सात बारा उतारा देखील या पिशवीत मिळून आलेला आहे. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा नातेवाईक असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कागदपत्रांवरुन त्याची पूर्ण ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






