T20 विश्वचषक! भारताचा नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुरुवारी झालेल्या दुसर्‍या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला. भारत या विजयानंतर गट २ च्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २ बाद १७९ धावा केल्या. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६२ धावा, रोहित शर्नाने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा आणि सूर्यकुमारने २५ चेंडूत नाबाद ५१ धावा काढल्या. के. एल राहुल सलग दुसर्‍या सामन्यात अपयशी ठरला तर विराटने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.

नंतर नेदरलँड्सला २० षटकांत १२३/९ थोपवले. नेदरलँड्सकडून टीम प्रिगलने (२०) सर्वाधिक धावा केल्या. भारतासाठी भुवनेश्वर कुमार (२/९) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर अक्षर पटेल (२/१८), रवीचंद्र अश्विन (२/२१), अर्शदीप सिंग (२/३७) आणि महंमद सामी (१/२७) यांनी चांगली साथ दिली. 

भारताकडून रोहित शर्माने आजवर ३४ षटकार टी२० विश्वचषक स्पर्धेत मारत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सूर्यकुमारला त्याच्या जलद नाबाद ५१ धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

 

टीम झुंजार