मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुरुवारी झालेल्या दुसर्या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला. भारत या विजयानंतर गट २ च्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २ बाद १७९ धावा केल्या. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६२ धावा, रोहित शर्नाने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा आणि सूर्यकुमारने २५ चेंडूत नाबाद ५१ धावा काढल्या. के. एल राहुल सलग दुसर्या सामन्यात अपयशी ठरला तर विराटने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
नंतर नेदरलँड्सला २० षटकांत १२३/९ थोपवले. नेदरलँड्सकडून टीम प्रिगलने (२०) सर्वाधिक धावा केल्या. भारतासाठी भुवनेश्वर कुमार (२/९) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर अक्षर पटेल (२/१८), रवीचंद्र अश्विन (२/२१), अर्शदीप सिंग (२/३७) आणि महंमद सामी (१/२७) यांनी चांगली साथ दिली.
भारताकडून रोहित शर्माने आजवर ३४ षटकार टी२० विश्वचषक स्पर्धेत मारत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सूर्यकुमारला त्याच्या जलद नाबाद ५१ धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले