मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : रविवारचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याने सामन्याचे महत्त्वाचे १९ वे षटक टाकताना अर्धशतकवीर शॉन विल्यम्सला धावबाद करून खेळाचे चित्र पालटले. शाकिबने उत्कृष्ट धावचीत केला कारण त्याला लक्ष्य टिपण्यासाठी फक्त एक यष्टी दिसत होती. विल्यम्सच्या बाद झाल्यामुळे खेळाचा संपूर्ण वेग बदलला कारण बांगलादेशने झिम्बाब्वेला एका रोमांचक सामन्यात तीन धावांनी पराभूत केले.
तत्पूर्वी, सलामीवीर नजमुल हुसेन शांतोच्या पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेत सात बाद १५० धावा केल्या. शांतोने ५५ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. अफिफ हुसैन (२९) आणि कर्णधार शकीब अल हसन (२३) धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी (२/१३) आणि रिचर्ड नगारावा (२/२४) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सने ६४ धावा केल्या पण अंतिम लक्ष्य ओलांडण्यात त्याला अपयश आले. बांगलादेशकडून तस्किन अहमद (३/१९) आणि मोसाद्देक हुसेन (३/३७) यांनी बळी घेतले. तस्किन अहमदला त्याच्या (३/१९) कामगिरी केल्याबद्दल सामनावीर ठरवण्यात आले.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.