मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसामुळे बांगलादेशच्या डावातून चार षटके कमी करण्यात आली त्यामुळे त्यांना १६ षटकांमध्ये १५१ धावांची गरज होती. पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशने घाईघाईत विकेट गमावल्यामुळे भारत पुन्हा अव्वल स्थानावर आहे. बुधवारी अॅडलेडमध्ये सुपर १२ चा सामना झाला. लिटन दास ६० धावांवर धावबाद झाल्यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली.
लवकरच मोहम्मद शमीने भारताला दुसरा विजय मिळवून दिला. त्यानंतर अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोघांना आणि पुढील षटकात हार्दिक पंड्याने दोघांना बाद केले. दरम्यान, भारताच्या २० षटकांत ६ बाद १८४ धावांच्या प्रत्युत्तरात लिटनने बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी त्याने २१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तत्पूर्वी, विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या.
विराटने चार सामन्यात तिसरं अर्धशतक लगावले. केएल राहुलने देखील सलामीला जोरदार खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने अखेर अर्धशतक झळकावले. बांगलादेशकडून हसन महमूद (३/४७) याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. भारताने बांगलादेशला १४५/६ पर्यंत रोखले. भारताकडून अर्शदीप सिंगने (२/३८) बळी घेतले. विराट कोहलीला (४४ चेंडूत नाबाद ६४) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.