निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील येथील वाघोदा रोडवर असलेल्या कै.महिपत विठोबा चौधरी विविध कार्यकारी सोसायटीच्या जागेत पोस्ट कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी सोसायटीच्या कार्यालयाचे व पोस्ट कार्यालयाच्या दरवाजांचे कडीकुलुप तोडून पोस्टाची तिजोरी लंपास केल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यात २८हजार ५०० रुपयांची चोरी झाली.
सविस्तर वृत्त असे की,दि.५ रोजी रात्री ११ ते पहाटे ०३वाजेदरम्यान चोरट्यांनी वडगांव ,वाघोदा रस्त्यावरील सोसायटी परिसरात कोणीच नसल्याचा फायदा घेत सोसायटी व पोस्ट कार्यालयाच्या कागद पत्रांची अस्ताव्यस्त करीत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ती न फुटल्याने पोस्ट कार्यालयाची चक्क तिजोरीच चोरून नेली.
त्यात २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. घटनास्थळी आ.शिरीष चौधरी,फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, फैजपूर ए.पी.आय आखेगावकर व निंभोरा पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. काशिनाथ कोळंबे, ए .एस. आय. राका पाटील,पो. कॉ .विकास कोल्हे, प्रल्हाद बोंडे,सुनील कोंडे,विकास सोसायटीचे चेअरमन सुधीर मोरे,नितीन पाटील यांनी भेट देत पाहणी केली.
श्वान पथक व ठसे तज्ञांद्वारे तपासणी – दरम्यान या प्रकरणी जलगावहून श्वानपथक व ठसे तज्ञांना बोलावून तपासणी करण्यात आली.यावेळी आ शिरीष चौधरी यांनी भेट देत पाहणी करून या पोस्ट कार्यालयात कॅमेरे बसविण्याची सूचना करीत पोलिसांशी घटनेबाबत चर्चा केली.दरम्यान या पोस्ट ऑफिसमध्ये ही तिसऱ्यांदा चोरी झाल्याने या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४