लोणार/उध्दव आटोळे
बुलढाणा :- जिल्ह्यात सर्वच गावात गुटख्यांच्या व्यसनापाई अनेक तरूणांना कॅन्सरचे तसेच जिभेचे दुर्धर आजार होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. राज्यात गुटखा बंदी असतांना शेजारच्या प्रदेशातून अवैध मार्गाने सर्रास गुटख्याची विक्री होते.गुटखा बंदी करा या मागणीसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, ठाणेदार यांना निवेदन देऊन कोणतीही कारवाई झाली नाही.
म्हणून गुटखा विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिबी (ता. लोणार) येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सुनिता भांड, लता घाईत,जिजा सदावर्ते यांना ताब्यात घेतले.
बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे गुटखा व दारू विक्री करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान ठाणेदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणीचा पाठपुरावा केला. मागणीवर कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आंदोलन करतांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






