बुलढाणा जिल्ह्यात गुटखा विक्री बंद करण्यासाठी बिबी येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

बुलढाणा :- जिल्ह्यात सर्वच गावात गुटख्यांच्या व्यसनापाई अनेक तरूणांना कॅन्सरचे तसेच जिभेचे दुर्धर आजार होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. राज्यात गुटखा बंदी असतांना शेजारच्या प्रदेशातून अवैध मार्गाने सर्रास गुटख्याची विक्री होते.गुटखा बंदी करा या मागणीसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, ठाणेदार यांना निवेदन देऊन कोणतीही कारवाई झाली नाही.

म्हणून गुटखा विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिबी (ता. लोणार) येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सुनिता भांड, लता घाईत,जिजा सदावर्ते यांना ताब्यात घेतले.


बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे गुटखा व दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान ठाणेदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणीचा पाठपुरावा केला. मागणीवर कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आंदोलन करतांना ताब्यात घेतले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार