सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे भारतीय रेल्वेत प्रवास करत असताना अनेक घोषणा करण्यात येत असतात. मात्र प्रवाशी याकडे लक्ष देत नाहीत. आपण अनेकदा लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाश्यांच्या जीवावर बेतलेल्या अनेक घटना पाहिल्या आहेत.
पायदान आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराकडे ट्रेनमधून उतरताना लक्ष द्या अशी घोषणा कायम प्रवाश्यांना दिली जाते. तीन भाषांमध्ये ही घोषणा दिली जाते तरी देखील लोक याकडे लक्ष देत नाही. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंगावर काटा आणेल अशी ही धक्कादायक घटना आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनमधून खाली उतरण एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे.एक तरुणी ट्रेनमधून उतरत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती रेल्वे प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील अगदी छोट्या जागेत अडकली. गणवेशावरून ती शाळा किंवा कॉलेजची विद्यार्थिनी दिसत आहे. त्या मुलीला अडकलेले पाहून रेल्वे पोलिसांनी ट्रेन थांबवली.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे पोलीस मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बाहेर काढण्यानंतर तिला जास्त दुखापत झाली नव्हती. पण खरचटल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे वाचलंत का ?
मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रुग्णालयात या मुलीचा मृत्यू झाला आहे. 20 वर्षीय शशिकलाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
दीड तास प्रेयत्न करून आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वेच्या इतर विभागांनी या मुलीला बाहेर काढलं आहे. मात्र अंतर्गत अवयवांना दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे..
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी रेल्वेला दोष देत आहेत. रेल्वे व प्लॅटफॉर्ममधील अंतरच काही ठिकाणी खूप जास्त असत असं अनेकांचं मत आहे. मात्र हा व्हिडीओ प्रत्येकाने पाहायलाच हवा जेणेकरून लोक ट्रेनमधून काळजीपूर्वक उतरतील.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






