Video: ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून तरुणीचा मृत्यू; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद…

Spread the love


सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे भारतीय रेल्वेत प्रवास करत असताना अनेक घोषणा करण्यात येत असतात. मात्र प्रवाशी याकडे लक्ष देत नाहीत. आपण अनेकदा लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाश्यांच्या जीवावर बेतलेल्या अनेक घटना पाहिल्या आहेत.

पायदान आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराकडे ट्रेनमधून उतरताना लक्ष द्या अशी घोषणा कायम प्रवाश्यांना दिली जाते. तीन भाषांमध्ये ही घोषणा दिली जाते तरी देखील लोक याकडे लक्ष देत नाही. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंगावर काटा आणेल अशी ही धक्कादायक घटना आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा एक  व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनमधून खाली उतरण एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे.एक तरुणी ट्रेनमधून उतरत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती रेल्वे प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील अगदी छोट्या जागेत अडकली.  गणवेशावरून ती शाळा किंवा कॉलेजची विद्यार्थिनी दिसत आहे. त्या मुलीला अडकलेले पाहून रेल्वे पोलिसांनी ट्रेन थांबवली.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे पोलीस मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  बाहेर काढण्यानंतर तिला जास्त दुखापत झाली नव्हती. पण खरचटल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

https://twitter.com/AhmedKhabeer_/status/1600451209886060544?t=17sNgF1mp5v4oZYsSToNOg&s=19

मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रुग्णालयात या मुलीचा मृत्यू झाला आहे.  20 वर्षीय शशिकलाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

दीड तास प्रेयत्न करून आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वेच्या इतर विभागांनी या मुलीला बाहेर काढलं आहे. मात्र अंतर्गत अवयवांना दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे..

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी  रेल्वेला दोष देत आहेत. रेल्वे व प्लॅटफॉर्ममधील अंतरच काही ठिकाणी खूप जास्त असत असं अनेकांचं मत आहे.  मात्र हा व्हिडीओ प्रत्येकाने पाहायलाच हवा जेणेकरून लोक ट्रेनमधून काळजीपूर्वक उतरतील.

हे वाचलंत का ?




टीम झुंजार