पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक वस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाले आहे. अनेक वर्षांपासुन या वस्त्यांमध्ये मुलभुत सुविधेसह अनेक समस्यांना दैनंदिन सामोरे जावे लागत होते. मतदारसंघातील अल्पसंख्यांक वस्त्यांचा देखील विकास व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांकडुन मोठी मागणी होत होती. यासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील हे वेळोवेळी पाठपुरावा करित होते. आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा दुरदृष्टीने व सततच्या पाठपुराव्याने
आज शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत ७५ लक्ष रूपयांचा विकासकामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. यात एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह., कासोदा भडगांव तालुक्यातील पिंपरखेड, गिरड व पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधकाम करणेसाठी प्रत्येकी १५ लक्ष अशा एकुण ७५ लक्ष रूपयांचा कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे मुस्लिम समाजाचे लहान-मोठे कार्यक्रम पुर्ण होणेसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची मतदारसंघातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा या दुरदृष्टीचे मुस्लिम बांधवांकडुन आभार व्यक्त केले जात आहेत. तर आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
हे पण वाचा
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.
- एरंडोलच्या अंजनी नदीवरील लहान-मोठा पुल धोकेदायक ? – चर्चा, आ. अमोलदादा पाटील यांचेकडे गर्हाणे मांडणार-नागरीक
- मोटार सायकल भाड्याने देण्यावरील निर्बंध हटवले – लायसन्स देण्यास परवानगी.
- दोघांनी केली किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या.दोघं संशयित आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी.
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.