पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक वस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाले आहे. अनेक वर्षांपासुन या वस्त्यांमध्ये मुलभुत सुविधेसह अनेक समस्यांना दैनंदिन सामोरे जावे लागत होते. मतदारसंघातील अल्पसंख्यांक वस्त्यांचा देखील विकास व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांकडुन मोठी मागणी होत होती. यासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील हे वेळोवेळी पाठपुरावा करित होते. आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा दुरदृष्टीने व सततच्या पाठपुराव्याने
आज शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत ७५ लक्ष रूपयांचा विकासकामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. यात एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह., कासोदा भडगांव तालुक्यातील पिंपरखेड, गिरड व पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधकाम करणेसाठी प्रत्येकी १५ लक्ष अशा एकुण ७५ लक्ष रूपयांचा कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे मुस्लिम समाजाचे लहान-मोठे कार्यक्रम पुर्ण होणेसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची मतदारसंघातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा या दुरदृष्टीचे मुस्लिम बांधवांकडुन आभार व्यक्त केले जात आहेत. तर आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






