रामकृष्ण पाटील प्रतिनिधी l विखरण
एरंडोल – आज दि.01/02/2023 रोजी एरंडोल तालुक्यातील एरंडोल ग्रामीण कक्षातील विखरण या गावात वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 3 रोहित्रावरील भागातील एकूण 152 घरगुती वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये 32 मीटर मध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले व ते मीटर टेस्टिंग साठी ताब्यात घेण्यात आले आहे. बर्याच ठिकाणी इलेक्टीक शेगडी चा अनाधिकृत वीजवापर आढळून आला.. तसेच 13 वीज कनेक्शन मध्ये मिटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला टॅपिंग द्वारा वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.
अशा एकूण 45 वीजचोरी उघडकीस आणल्या. जप्त करण्यात आलेल्या मिटरची मिटर टेस्टिंग युनिट येथे तपासणी करून वीज चोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीज बिल न भरल्यास त्या ग्राहकांवर तत्काळ वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.. सदर कारवाईमुळे परिसरातील वीजचोरामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
सदर मोहीम मा. कार्यकारी अभियंता धरणगाव श्री. पवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता कु लक्ष्मी माने, स. अ.श्री. प्रशांत महाजन, श्री. राहुल पाटील, श्री युवराज तायडे व श्री इच्छानंद पाटील यांच्यासह एरंडोल उपविभागा तील सर्व जनमित्रांनी सहभाग घेवून मोहिम यशस्वीपणे पार पाडली…
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.